
श्री हिंगुलांबिका देवी सोलापूरच्या पूर्वभागातील गणेश पेठत सुमारे शंभर वर्षांपूर्वी श्री हिंगुलांबिका देवीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती . देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची , विविध शस्त्रे धारण केलेली आष्टभुजांची असून उग्ररुपाची आहे . मूर्ती पंढरपूर तीर्थक्षेत्रातून घडवून आणली आहे . पार्वती - आंबिकाचे रूप असल्याने हिंगुला - अंबिका म्हणजेच हिंगुलांबिका आसे नाव आलेले आहे. ही भावसार समाजाची कुलस्वामिनी आहे. देवीचे मूळस्थान भारताच्या वायव्येला असलेल्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रदेशातील हाव नदीच्या पलीकडे चंद्रकूप तीर्थ स्थानानंतर मकरंद पर्वत शिखरावर दुर्गम व कठीण अशा हिंगलाज गुहेत स्वयंभू प्रज्वलीय अग्नी व ज्योतीच्या प्रकाशात आहे. भारत, पाकिस्तान व इराण या तीन देशांचे समन्वय साधणारे आपल्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या ५१ मातृपीठ शक्तिपीठांपैकी एक असणारे मरूतीर्थ हिंगलाज भारतातील भाविक लोकांना जाण्यासाठी कठीण आहे . पाकिस्तानात हिंगलाज देवीला नानीमां आस म्हणतात . दक्ष प्रजापतीच्या यज्ञात देवी सतीने क्रोधाने आत्मसमर्पण केलेल्या पृथ्वीतलावर ५१ ठिकाणी प्रमुख शक्तीपीठांची निमिर्ती झाली . या शक्तीपीठातील प्रमुख व अग्रगण्य शक्तीपीठ म्हणजेच हिंगलाज आग्नेय तीर्थ शक्तीपीठ आहे . अनेक देव ऋषीमुनी , सिद्धपुरुष देवीभक्तांचे पवित्र पूजनीय व जागृत असे हे शक्तीपीठ आहे . भावसार समाजाचे भव्य व सुंदर मंदिर सोलापुरातील गणेशपेठेत आहे . जो वास्तुशिल्पाचा आदर्श व उत्कृष्ट नमुना म्हणून महाराष्ट्रत ओळखला जातो . पूर्ण बांधकाम हे गर्भगुडी काळ्या पाषाणाचे असून आतील भाग मार्बलने सुशोभित केलेला आहे . शिखराची उंची ६५ फूट असून त्यावर अनेक देवदेवतांचे सुंदर मनोहीरी अशा मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत . ५५ किलो चांदीचे सिंहासन आहे . सध्या मंदिर रंगरंगोटीने पूर्ण केलेली असून मंदिराच्या कळसावर ४ किलो सोन्याचा लेप दिला आहे. भावसार देवी ही आराध्य व कुलदैवत असून भक्तांची पालनकर्ती आहे




