श्री गणेश प्रतिष्ठान

मानाचा श्री रिद्धी-सिद्धी गणपती श्री गणेश प्रतिष्ठान आमच्या मंडळाचा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा वारसा : श्री गणेश प्रतिष्ठानची १९६८ पासूनची परंपरा; विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन शहरातील मानाचा श्री रिद्धी-सिद्धी गणपती म्हणून ओळख असलेल्या श्री गणेश प्रतिष्ठानची स्थापना सन १९६८ मध्ये झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना एकत्र आणण्याबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य प्रतिष्ठानकडून केले जाते. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील तसेच शहरातील भाविक मोठ्या संख्येने घेतात. गणेशोत्सवाच्या काळात प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वेगवेगळे आकर्षक देखावे सादर केले जातात. धार्मिक, सामाजिक तसेच प्रबोधनात्मक विषयांवर आधारित देखाव्यांमधून नागरिकांचे मनोरंजन करण्यासोबतच विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय प्रतिष्ठानच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. गणपती बाप्पा मोरया