श्री अष्टविनायक मित्र मंडळ

*🚩 श्री अष्टविनायक मित्र मंडळ, भवानी पेठ, सोलापूर 🚩* *श्री अष्टविनायक मित्र मंडळ* हे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेले मंडळ आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळातर्फे आकर्षक *मूर्ती देखावे, थर्माकोल देखावे तसेच विविध देवी-देवतांचे सुंदर व कलात्मक डेकोरेशन* साकारण्यात येते. मंडळाच्या कार्यातून भक्ती, कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मंडळाने साकारलेल्या विविध देखाव्यांना *अनेक मान्यवरांकडून व विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके व गौरव* प्राप्त झाले आहेत. यावर्षी मंडळातर्फे विशेष आकर्षण म्हणून *“श्री जगन्नाथ पुरी” मूर्ती देखावा* साकारण्यात आला आहे. श्री जगन्नाथ, श्री बलभद्र व माता सुभद्रा यांच्या दर्शनासोबतच पुरी धामची संस्कृती, भक्ती आणि परंपरा भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे. यासोबतच मंडळातर्फे दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. गणेशभक्त व नागरिकांसाठी भक्तिमय वातावरणात *महाप्रसादाचे वाटप* केले जाते.मंडळाच्या वतीने वर्षभर विविध *धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन* केले जाते. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे, धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे आणि सामाजिक बांध